Latest Marathi News
Ganesh J GIF

लष्करी अधिकाऱ्याची विमान कर्मचा-याला बेदम मारहाण

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, जीवघेण्या हल्ल्यात कर्मचारी जबर जखमी, नो फ्लायची कारवाई

श्रीनगर – श्रीनगर विमानतळावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने देशभरात खळबळ उडवली आहे. केवळ अतिरिक्त सामानासाठी पैसे भरण्यास सांगितल्यामुळे संतापलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने स्पाईसजेटच्या चार कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

लेफ्टनंट कर्नल रितेश कुमार सिंह हे दोन केबिन बॅग घेऊन बोर्डिंग गेटवर आले होते. त्या बॅगांचे एकूण वजन १६ किलो होते, जे केबिन बॅगेसाठी निर्धारित ७ किलोच्या मर्यादेपेक्षा अधिक होते. कर्मचार्‍यांनी अतिरिक्त सामानासाठी शुल्क भरण्याची विनंती केल्यावर अधिकारी संतापले आणि त्याने थेट कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात दिसत आहे की अधिकारी हातात चेक-इन बोर्ड घेऊन कर्मचाऱ्यांवर वार करत आहे. यावेळी सीआयएसएफच्या एका जवानाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अधिकारी धमकावत आणि शिवीगाळ करत हल्ला करतच राहिला. अधिकाऱ्याने विमानतळावरील कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी, एक कर्मचारी बेशुद्ध पडला होता, तरीही संबंधित व्यक्तीकडून मारहाण करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर, एका कर्मचाऱ्याला तोंडावर जबर मारहाण झाली असून त्याच्या नाका-तोंडातून रक्त बाहेर आले आहे. सध्या सर्वच जखमी कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत एका कर्मचाऱ्याच्या पाठीचा कणा मोडला असून, दुसऱ्याचा जबडा तुटला आहे. ही घटना २६ जुलै रोजी घडली असून, याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. व्हिडिओत एक कर्मचारी बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळल्यानंतरही संबंधित अधिकारी त्याच्यावर लाथा मारत असल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे नागरी विमान सेवांतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान विमानात चढण्याच्या नियमानुसार, केवळ ७ किलोपर्यंतचे सामानच अतिरिक्त शुल्काशिवाय केबिनमध्ये नेण्याची परवानगी असते.

 

यानंतर, स्पाईसजेटने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे आणि लष्करी अधिकाऱ्याला ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एअरलाइनने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, लष्करानेही या गंभीर प्रकाराची दखल घेत चौकशी आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!