
मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलाची धोकादायक स्टंटबाजी व्हायरल
स्टंडबाजीचा व्हिडिओ व्हायरल, टिका होताच व्हिडिओ डिलीट, नागरिकांच्या जीवाला धोका?, ग्रोकचीही वादात उडी
सातारा – राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यामागील अडचणी वाढतच चालल्या आहेत. आता गोरे त्यांच्या सुपुत्रामुळे अडचणीत आले आहेत. त्यांचा मुलगा आदित्यराज गोरे यांनी सातारा-कोल्हापूर महामार्गावर धोकादायक पद्धतीने बाईक स्टंटबाजी केल्याचे कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आदित्यराज गोरे यांचे काही व्हिडिओ भैय्या पाटील यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केले असून त्यात आदित्यराज हा स्टंटबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर सुरू झालेल्या टीकेमुळे आता मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे स्टंटबाजीचे व्हिडिओ डिलीट केले आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भैय्या पाटील यांनी हे व्हिडिओ शेअर करत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज हा सातारा-कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जिविताला धोका निर्माण करत आहे. या स्टंटचे रील्स लाईव्ह स्वत:च्या सोशल मीडियावर टाकून अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात आहे. सदर बाईकला नंबर प्लेटसुद्धा नाही. कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का? सर्व सामान्य व्यक्तीने असे कृत्ये केले तर त्याची गाडी जप्त करून मोठा दंड, ते ३ महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा केली जाते. मग इथे वेगळा न्याय का? असा सवाल असा सवाल उपस्थित केला आहे. महत्वाचे म्हणजे ग्रोकनेही या वादात उडी घेत काय कारवाई होऊ शकते याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान आता या प्रकरणाकडे राज्य सरकार कसे पाहतं? यावरून जयकुमार गोरे कोणते स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागणार आहे.
https://x.com/BhaiyaPatil/status/1906698188938948975?t=LwEVQ321032OYyh0QT0mZA&s=19
खासदार संजय राऊत यांनी गोरे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे. राऊत यांनी, मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत का? जे साताऱ्यात सुरू आहे. ते आधी काय आहे याकडे आधी पाहावे, असे राऊत यांनी म्हटलं आहे.