रिक्षाचालकाने छेड काढल्याने अल्पवयीन मुलीने केले असे काही
औरंगाबादमधील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल,बघा काय घडल
ओैरंगाबाद दि १६(प्रतिनिधी)- औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात रिक्षा चालकाने रिक्षात बसलेल्या एका मुलीची छेड काढल्याने अल्पवयीन मुलीनं रिक्षातून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक छेड काढत असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षातून मुलीने उडी टाकल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या व्हिडिओ पाहून थरकाप उडाला आहे. क्लासेस संपल्यानंतर घरी जाताना रिक्षात बसलेल्या अल्पवयीन मुलीची रिक्षा चालकाने तिची छेड काढली. यामुळे भीतीने अल्पवयीन मुलीने चालत्या रिक्षातून उडी मारली. यामुळे तिच्या डोक्याला जखम झाली आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याप्रमाणे रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी नराधम रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे. सय्यद अकबर सय्यद हमीद असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. पण या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहरात एक महिलेने धावता रिक्षातून उडी मारली होती. त्यानंतर आता तसाच प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरात महिला आणि मुलींना छेडछाडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.