गोपीनाथ मुंडेमुळे वाल्मीक कराडवर मोक्काची कारवाई
गोपीनाथ मुंडेकडे घरगडी असणारा कराड मुंडेमुळेच अडचणीत, कसे ते जाणून घ्या?
बीड – संतोष देशमुख हत्याप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराडवर केज न्यायालयाने मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अचानकपणे गोपीनाथ मुंडेंच नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाबरोबरच वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळे परळीत तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पण जो वाल्मीक कराड गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरगडी म्हणून काम करत होता. पण त्याच गोपिनाथ मुंडे यांच्यामुळेच मकोका लावण्यात आला आहे. राज्यात १९९५-९९ च्या काळात युतीचे सरकार असताना गोपिनाथ मुंडे गृहमंत्री होते. त्यानींच मकोका कायदा आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. कारण मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे राज्यात अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या. त्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापलं होते. त्याचवेळी वाढलेल्या गुन्हेगारीविरोधात कडक पावले उचलण्याची गरज होती. त्यामुळे मुंडे यांनी टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका कायदा आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. केंद्र सरकारने या कायद्याला मंजुरी दिली. त्यानंतर राज्यात २४ फेब्रुवारी १९९९ साली मकोका कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. पण २५ वर्षानंतर मुंडे यांच्याच जवळच्या व्यक्तीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हफ्ता वसुली, खंडणी, खंडणीसाठी अपहार, खुनाची सुपारी देणे, खून, अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो. गुन्ह्यात फक्त एक व्यक्ती असेल तर मोक्का लावता येत नाही. जेव्हा गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक जण असतील तर त्याला टोळी ग्राह्य धरून मोक्का लावला जातो.