
भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यावर ३० हून अधिक खटल असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात उघड केले आहे.ज्यामध्ये गुंडगिरी, फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.अनेक नेत्यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर आहे. सतत नवीन धक्के, बदलते पक्ष या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुढे काय घडणार याचा अंदाज बांधणं जवळपास अशक्य आहे असं म्हटलं जातं. 7 टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
नेत्यांची पक्षांतराची प्रक्रियाही शिगेला पोहोचली आहे. एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची रांग खूप मोठी आहे. पक्ष बदलताच तिकीटावर शिक्कामोर्तब होतो. शरद पवार यांच्या पक्षातील एका नेत्यावर तर 12 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळालं.नुकतेच भाजप सोडून राष्ट्रवादीत (शरदचंद्र पवार) दाखल झालेले धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात जे खुलासे केले, त्यावरून शरद पवारांनी दिलेल्या उमेदवारीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे .पक्षाने मोहिते यांच्यावर एक-दोन नव्हे तर ३० हून अधिक गुन्हे दाखल असताना उमेदवारी कशी दिली याची चर्चा आहे. मोहिते पाटलांवर राजकारण का तापले आहे ते आम्ही 5 मुद्द्यांमधून समजावून घेऊ.धैर्यशील यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.राष्ट्रवादी-शरद पवार पक्ष अनेक खटल्यांचा सामना करणाऱ्या गुन्हेगारांना तिकीट देत आहे.त्याच्यावर गुंडगिरीचे गुन्हेही दाखल आहेत.कोरोनाच्या काळात सार्वजनिक जीवन धोक्यात आणल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
माढा मतदारसंघाचा इतिहास
2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेल पक्षाकडे असलेली माढाची जागा 2019 ला मात्र भाजपने मोठ्या मताधिक्क्याने मिळवली होती. आता पुन्हा एकदा ही जागा शरद पवार यांच्या गटाकडे गेली आहे. भाजपने पुन्हा एकदा रणजीत नाइक निंबाळकर यांच्यावर विश्वास टाकला. 2024 ची निवडणूक ही रणजीत नाइक निंबाळकर विरुद्ध धौर्यशील मोहिते पाटील पाहायला मिळणार आहेत.2009 शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2014 विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2019 रणजित नाईक-निंबाळकर भारतीय जनता पार्टी
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला होता. मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला दणका देत पक्षातून राजीनामा दिला होता. सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे सरचिटणीस मोहिते पाटील यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे 10 एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्राद्वारे वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता. या सर्व राजकीय पेचप्रसंगात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहिते पाटील आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केली होती. मोहिते यांनी राष्ट्रवादीत प्रवेशच करताच त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीटही मिळाले.माढा येथील भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक-निंबाळकर यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. माढा येथे चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे.