‘कंडोमचा सर्वाधिक वापर मुस्लीमच करतात’
भागवतांच्या असमतोलच्या मुद्द्यावर ओवेसीचे प्रत्युत्तर, पहा अजून काय म्हणाले...
हैद्राबाद दि ९(प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसंख्येच्या असमतोलाचा मुद्दा दुर्लक्षित करू नये, असं ते म्हणाले होते. यावर ओवेसींनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवत यांनी देशातील धार्मिक असंतुलनावर भाष्य केले होते. यावर देखील ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ओवेसी म्हणाले की, “मुस्लीम लोकांची लोकसंख्या वाढत नसून कमी होत आहे. तुम्ही त्याचा उगाच तणाव घेऊ नका. कुटुंब नियोजन सर्वात जास्त मुस्लीम लोक करत आहेत. सर्वात जास्त कंडोम मुस्लीम समाज वापरत आहे. भाजपा नेत्यांच्या वडिलांनी किती अपत्यांना जन्म दिला? असे म्हणत मुस्लिमांच्या लोकसंख्येवर तपशीलानुसार बोलायला हवं, असा सल्ला ओवैसी यांनी भागवतांना दिला आहे. दसरा मेळाव्यात भाषणादरम्यान लोकसंख्येच्या असमतोलावर चर्चा केली होती.’लोकसंख्या असंतुलनावर लक्ष ठेवणे हे राष्ट्रहिताचे आहे. धर्मआधारित असमतोल आणि सक्तीचे धर्मातर यामुळे देशाचे तुकडे होण्याची भीती आहे. असे वक्तव्य भागवत यांनी केली होती.
एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल तयार होतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमादेखील बदलून जातात, असा इशारा भागवत यांनी दिला होता. त्याला उत्तर देताना ओवेसी यांनी मुस्लीम एकटे जबाबदार नसल्याचे वक्तव्य केले होते. यावर भाजपा काय उत्तर देते हे पहावे लागणार आहे.