Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटातील खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार?

नव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, खासदार श्रीकांत शिंदेचा पत्ता कट होणार, भाजपाचा शिंदे गटावर दबाव

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात येत आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटातील खासदारांना भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणुक लढवावी लागेल असा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघच भाजपा घेऊ शकते असा देखील दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नवी चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या कल्याणचे खासदार आहेत. पण सत्तेत एकत्र असूनही कल्याणमध्ये मात्र नेहमीच भाजप आणि शिंदे गटात खटके उडत आहेत. भाजपातील काही पदाधिकारी तर श्रीकांत शिंदे यांनी खासदार होऊन दाखवावेच असे आव्हान देत आहेत. मध्यंतरी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे भाजपाने कल्याणमध्ये आपल्या बैठकांचे सत्र सुरु केली आहे. भाजपाचे मंत्री रवींद्र शिंदे यांना भाजपा कल्याणमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कमळ या चिन्हावर निवडणुक लढण्यास भाग पाडून त्यांचे वेगळे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. आमदार रोहित पवार यांनी देखील भाजप कल्याण लोकसभेची सीट मागून घेईल, नाहीतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर ही निवडणूक लढवावी लागेल असा दावा केला आहे. दरम्यान शिवसेनेतील अपात्रतेचा मुद्दा लवकरच निकालात निघणार आहे. त्यात शिंदे अपात्र ठरतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर शिवसेना हा पक्षसुद्धा त्यांच्या हातातून जाऊ शकतो त्यामुळे भाजपा आपल्या चिन्हावर लढण्याची अट ठेवत शिंदे गटातील खासदारांना तिकिट देईल असाही अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. यामुळे येत्या काळात शिंदे गट काय भूमिका घेते पहावे लागेल.

भाजपसोबत जाण्याची भूमिका रोहित पवारांनीच शरद पवारांसमोर मांडली होती, असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी सुनील शेळके यांनी केला होता. पण सुनील शेळके आमचे मित्र आहेत, त्याचं वक्तव्य हास्यास्पद आहे. पूर्ण स्टेटमेन्ट मी ऐकीनं आणि यावर उत्तर देईन असे उत्तर रोहित पवार यांनी दिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!