
मुंबई गुजरातची आहे, महाराष्ट्राची नाही मराठी फक्त
भाजपा खासदाराची ठाकरे बंधुंवर जोरदार टिका, राज आणि उद्धव ठाकरे काही लॉर्ड नाहीत, म्हणत...
मुंबई – मीरा रोड येथे एका अमराठी भाषिकाला मारहाण झाल्यानंतर मराठी विरूद्ध अमराठी वाद उफाळून आला आहे. त्यातून भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी हिंदी वादात ठाकरे बंधूना त्यातही राज ठाकरेंवर खासदार निशिकांत दुबे सातत्याने टिका करत आहे. आता पुन्हा एकदा दुबेंनी राज ठाकरे आणि मराठी माणसाला डिवचले आहे.
“भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल प्रेम आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरवशाली इतिहास आहे, यात शंका नाही. पण मुंबईत आजही फक्त ३१-३२% मराठी भाषिक राहतात. मुंबई ही पूर्वी गुजरातचा भाग होती, १९५६ मध्ये भाषिक आधारावर विभागणी झाल्यावर ती महाराष्ट्राचा हिस्सा बनली.” त्यांनी पुढे म्हटले की, “महाराष्ट्र देशाचा भाग आहे. कोणीही कुठेही स्थायिक होऊ शकते. जर राज ठाकरेंना गैर-मराठी लोक नको असतील, तर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनसमोर काठी घेऊन जावे, कारण त्यांना मराठी येत नाही.” असे म्हणत मुंबई गुजरातची असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर दुबे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांना हिंदी शिकवल्याचा दावा केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही मोठे लॉर्ड साहेब नाहीत. मी खासदार आहे आणि कायदा हातात घेत नाही. राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक मारतील. पण जेव्हा केव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राबाहेर जातील तिथले नागरिक… मग ज्या कोणत्या राज्यात जातील, तिथे त्यांना आपटू आपटू मारतील, असा इशारा दुबे यांनी दिला आहे. दरम्यान निशिकांत दुबे यांनी यापूर्वीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना महाराष्ट्रावरही टीका केली होती. तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तिथे टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे. कोणाचेही महाराष्ट्रात प्रकल्प नाहीये. तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात? असे वक्तव्य केले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपा खासदार निशिकांत दुबेंना आव्हान दिले आहे. तू मुंबईत आल्यानंतर समुद्रात बुडवून मारेन अशा शब्दांत राज ठाकरेंनी मिरा रोडमधील सभेत इशारा दिला आहे, त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.