Latest Marathi News
Ganesh J GIF

त्या व्यक्तीमुळे माझ्या पतीला भारतीय संघातून वगळण्यात आले

'या' क्रिकेटपटूच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा, 'द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ' पुस्तकात खुलासा, तो व्यक्ती कोण?

मुंबई – भारतीय क्रिकेट संघ लवकरच इंग्लडमध्ये जाऊन पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण त्याआधीच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीमुळे भारतीय संघ कमकुवत ठरत असताना आता कसोटी क्रिकेट स्पेशल चेतेश्वर पुजाराची चर्चा होऊ लागली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजाराने अनेक विजयात मोलाची कामगिरी निभावली. चेतेश्वर पुजारा आता मात्र भारतीय संघाचा भाग नाही. त्याने तिन्ही प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. पण आता त्याची पत्नी पूजा पुजाराने मोठा खुलासा केला आहे. पुजाराची पत्नी पूजाने तिच्या ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ या पुस्तकात त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. या पुस्तकात तिने २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानचा प्रसंग सांगितला आहे. ती म्हणाली पर्थ कसोटीत पुजारा फॉर्ममध्ये नव्हता. त्या सामन्यात त्याने फक्त 28 धावा केल्या होत्या. तसेच त्याला हॅमस्ट्रिंगची हलकी दुखापत झाली होती. त्यामुळे पुजाराने आपल्या तीन दिवसांच्या ब्रेकचा पुरेपूर फायदा घेतला होता. तो रुमच्या बाहेर अजिबात आला नव्हता. त्याने त्याच्या शरिराला विश्रांती दिली आणि त्याच्या ताणलेल्या हॅमस्ट्रिंगवर उपचार केले. एकदा तो एकटाच असताना फोनवरील संभाषण ऐकलं. फोनवर ती व्यक्ती तावातावाने माझा पती अनफिट असल्याने त्याला संघात घेऊ नये असं सांगत होती. तो फार कटू अनुभव होता. पण चेतेश्वरने आपण बोलणं ऐकलं आहे याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. तसंच त्याने वडिलांच्या वैद्यकीय स्थितीबद्दल कोणालाही सांगितलं नाही. पण माघारी आल्यावर साधा आणि नम्र स्वभावाच्या पुजाराने अखेर आपल्या पत्नीसमोर नेमकं काय झालं होतं हे उघड करण्याचा निर्णय घेतला. पण हे करताना त्याला खूप तयार करावं लागले होते. मैदानावरील घडामोडी आणि राजकारणाबद्दल मला इतर खेळाडूंच्या पत्नींकडून माहिती मिळत असे. तो माझ्याशी यासंदर्भात कधीच बोलत नसे. पण तो खेळाडू कोण याबाबत मात्र पुस्तकात खुलासा करण्यात आलेला नाही. चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी चांगली नव्हती. संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागला. आता काही दिवसांत इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची निवड होणार आहे आणि पुजारा पुनरागमन करू शकतो की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

पुजाराने आतापर्यंत १०३ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने १७६ डावांमध्ये ७,१९५ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत १९ शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली आहेत. पुजाराने कारकिर्दीत ३ द्विशतके देखील झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या २०६ राहिली आहे. पुजाराने जून २०२३ मध्ये त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!