Latest Marathi News
Ganesh J GIF

“माझ्या रात्री वाया जात आहेत, माझ्यासाठी नवरी शोधा”

शिक्षकाच्या अनोख्या पत्राची जोरदार चर्चा, इलेक्शन ड्यूटीवर जाण्यास नकार, अपेक्षा पाहून डोक्याला हात लावाल!

भोपाळ दि ४(प्रतिनिधी)- निवडणुका जवळ आल्यामुळे देशात रोज नवनवीन घटना घडत आहेत. त्याचबरोबर पाच राज्यात सध्या निवडणुकीचा धुरळा उडत आहे. पण याच काळात इलेक्शन ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाची जोरदार चर्चा होत आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात एक अजब गजब घटना समोर आली आहे. याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

मध्‍य प्रदेशमध्‍ये सध्‍या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रशासन या निवडणुकीच्‍या तयारती व्‍यस्‍त आहे.राज्‍यातील सर्व शिक्षकांना निवडणूक ड्युटी देण्‍यात आली आहे. यासाठीचे ट्रेनिंग १६ ते १७ ऑक्‍टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. पण या शिबीराला अखिलेश कुमार मिश्रा यांनी दांडी मारली. त्‍यामुळे राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यात आपण निष्काळजीपणा दाखवला आहे. आपणास निलंबित का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस मिश्रा यांना बजावण्‍यात आली होती. पण मिश्रा यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा होत आहे. “माझं संपूर्ण आयुष्य माझ्या पत्नीशिवाय व्यतीत होत आहे, माझ्या रात्री वाया जात आहेत. आधी माझं लग्न करून द्या. 3.5 लाख रुपयांचा हुंडा (रोख किंवा खात्यात) आणि ‘सिंगरौली टॉवर किंवा समद्रिया, रीवा’ येथील फ्लॅटसाठी कर्ज मंजूर करून हवं.काय करू? माझ्याकडे शब्द नाहीत, तुम्ही ज्ञानाचा सागर आहात” असे अजब उत्तर दिले आहे. दरम्यान सतनाचे जिल्हाधिकारी अनुराग वर्मा यांनी शिक्षकाला दोन नोव्हेंबर रोजी निलंबित केले आहे. मिश्रा यांची या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मिश्रा फोन वापरत नाही असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. मिश्रा हे गेली काही वर्षे तणावाखाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पण या अनोख्या प्रकाराची जोरदार चर्चा होत आहे.

अखिलेश कुमार मिश्रा भोपाळपासून सुमारे ४५० किमी अंतरावर असलेल्या सतना जिल्ह्यातील अमरपाटन येथे शिक्षक आहेत. ते महुदर उच्च माध्यमिक विद्यालयात संस्कृतचे शिक्षक आहेत. निवडणुकीबरोबरच सध्या मिश्रा देखील व्हायरल झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!