Latest Marathi News
Ganesh J GIF

नागपूर ऑडी कार अपघात प्रकरण ; संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांचे फुटेज डिलीट?

नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांचे नाव समोर आले आहे. 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री संकेत बावनकुळेंच्या भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. या घटनेवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पहिल्यांदा संकेत बावनकुळे यांचे नाव घेतले आणि प्रकरण तापले.

अपघात प्रकरणी पोलिसांनी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणि आणखी एक तरुण हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाही. संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज लाईव्हमध्ये पाहण्याची सोय आहे. त्याचे रेकॉर्डिंग डीव्हीआरमध्ये झालेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाने जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचे प्रयत्न केले, तेव्हा चारही तरुण तिथे गेले असताना ही ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाल्याचे दिसून आलेले नाहीत.

पोलिसांनी पुढील तपासणीसाठी हॉटेलचे डीव्हीआर जप्त केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, पोलीस या डीव्हीआरची फॉरेन्सिक चाचणीही करणार आहेत. त्यामुळे जर काही फुटेज त्याच्यामधून डिलीट केले गेले असतील, तर ते नक्कीच फॉरेन्सिक चाचणीत समोर येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, लाहोरी हॉटेल ते अपघात स्थळादरम्यान तीन ते चार ठिकाणांचे रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये दिसत असलेल्या चित्रीकरणाच्या आधारावर पोलिसांचा सध्याचा तपास सुरू आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!