Latest Marathi News
Ganesh J GIF

या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या होणाऱ्या पतीचे नाव आले समोर

रोमँटिक अंदाजात आयफेल टाॅवरसमोर केले प्रपोज, बघा फोटो

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- बाॅलीवूडबरोबरच साऊथमध्ये प्रसिद्ध असणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने नुकतेच तिच्या रोमँटिक प्रपोजलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या होणाऱ्या पतीची झलक पाहायला मिळाली आहे. ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. स्वतः हंसिकाने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे

मागील काही दिवसांपासून हंसिकाच्या लग्नाची चर्चा जोरात सुरु होती. राजस्थानमधील एक पॅलेस बुक केल्याची चर्चाही जोरात सुरु होती. पण तेंव्हा होणाऱ्या पतीचे नाव उघड करण्यात आले नव्हते. आता तिच्या होणाऱ्या पतीचे नाव समोर आले आहे. हंसिकाने आपल्या रोमँटिक प्रपोजलचे फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या होणाऱ्या पतीची झलक दाखवली आहे. अभिनेत्रीने पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर तिचा प्रियकर सोहेल कथुरियासोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोहेल गुडघ्यावर बसून हंसिकाला प्रपोज करताना दिसत आहे. आयफेल टॉवर आणि नदी किनाऱ्याने या क्षणाला आणखी रोमँटिक बनवले आहे. यामुळे हंसिकाचा होणारा पती कोण याची चाहत्यांची असलेली उत्सुकता संपली आहे. दोघेही फिटोत एकदम रोमँटिक वाटत आहेत. हंसिकाच्या या फोटोंवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे.

अभिनेत्री हंसिका मोटवानी ज्याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे, त्याचे नाव सोहेल कथुरिया आहे. सोहेल हा मुंबई स्थित एक बिझनेसमन आहे. हंसिका मोटवानी आणि राहुल मागील काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. इतकेच नाही, तर २०२० पासून ते एका इव्हेंट प्लॅनिंग कंपनीत भागीदार देखील आहेत. डिसेंबरमध्ये दोघेजण लग्न करणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!