हे नरेंद्र मोदी वर्षाला विकतात एक कोटींची पाणीपुरी?
पहा व्हायरल व्हिडिओचे सत्य काय?, पहा नेमका प्रकार काय
अहमदाबाद दि ९(प्रतिनिधी)- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता फक्त महाराष्ट्रात नाही तर संपुर्ण जगात आहे. पण देशाचे कारभार पाहणारे मोदी चक्क पाणीपुरी विकतात असे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे काहीसे खरे आहे. कारण एक पाणीपुरीवाला नरेंद्र मोदींसारखा दिसतो. त्याचबरोबर त्याचे वागणे आवजही मोदींसारखा आहे.
जगात एकसारखे दिसणारी ७ माणसे असतात असे म्हटले जाते. यासाठी ७ जुळ्यांची गोष्ट देखील आहे. पण मोदींच्या अहमदाबादमध्येच त्यांचा डुप्लिकेट आहे. या व्यक्तीचं नाव अनिल ठक्कर असं आहे. हा व्यक्ती अहमदाबादमध्ये पाणी पुरी विकण्याचे काम करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा व्यक्ती वर्षाला थोडी थुडकी नाही तर चक्क १ कोटी रुपयांची पाणी पुरी विकतो. आश्चर्याची बाब म्हणजे हा केवळ मोदींसारखा दिसतच नाही तर त्याचा आवाजही मोदींसारखा आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. अनिल यांनी आपला प्रवास सांगताना आपण १५ वर्षापासून पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले आहे. पण त्याच बरोबर ते जर मी चहा विकला असता तर देशाचा पंतप्रधान झालो असतो असे गमतीने सांगत असतात. त्यांच्या दुकानात अनेक जण खास फोटो काढण्यासाठी गर्दी करत असतात.
पंतप्रधान मोदींच्या डुप्लिकेटचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर eatinvadodara नावावरून शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या हुबेहूब दिसणा-याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.