Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्‍नासाठी नवरदेवाचा पुराच्‍या पाण्‍यातून प्रवास….बघा थरारक अनुभव…?

नांदेड जिल्हा प्रतिनिधी – नांदेड जिल्हयात मागील पाच दिवसा पासुन संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले ओसंडुन वाहत आहेत, अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला असतांना वाहतुकही बंद आहे, अशातच लग्‍नाची नियोजीत वेळ गाठण्‍यासाठी नवरदेवासह वरहाढी मंडळीनी चक्‍क थर्माकोलची होडी करून त्‍यावरून 7 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास केला .

नांदेडच्‍या हदगाव तालुक्यातील करोडी येथील तरूणाचे लग्‍न उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथे होणार होते. तत्पुर्वी होणारया टिळा आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरदेव थर्माकॉलच्या होडीवरून वरून सासुरवाडीत पोहोचला . लग्नासाठी उतावीळ म्‍हणून नाही तर नियोजीत वेळेत सर्व विधी पार पडावेत या हेतूने त्‍याने जीवघेणा प्रवास करीत सासुरवाडी गाठली. शहाजी माधव राकडे असे या तरूणाचे नाव असून तो मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालवतो. अतिवृष्‍टीमुळे सर्व रस्‍ते बंद पैनगंगा नदीलाही पूर आलेला . अशा स्थितीत लग्‍नाची वेळ गाठण्‍यासाठी नवरदेवासह वरहाडी मंडळीने चक्‍क थर्माकोलची होडी करून नवरीचे गाव संगम चिंचोली गाठले. त्‍याचा व्हिडिओ सध्‍या चांगलाच व्‍हायरल झालाय. या आगळयावेगळया लग्‍नाची चर्चा सध्‍या सोशल मिडियावर सुरू आहे.

बघा बातमी 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!