Latest Marathi News
Ganesh J GIF

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर?

भाजपाच्या या नेत्याचा दावा, राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

सांगली दि २२(प्रतिनिधी)- येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल, असं वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट पडणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे.

सांगली जिल्ह्यातील उटगी येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी फार मोठा दावा केला आहे. जयंत पाटील भाजपात येणार एवढचं नाही तर जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल. त्यानंतर बारामती, मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला असेल. काही दिवसांनी राष्ट्रवादी विसर्जित करून ९० टक्के लोक भाजपमध्ये येतील असेही पडळकर म्हणाले आहेत. जयंत पाटील यांच्या मुलाच्या वाढदिवसावेळेस शुभेच्छा बॅनरवरुन पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचे घड्याळ गायब झाले होते तेंव्हापासून जयंत पाटील राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.अलीकडे जयंत पाटील भाजपा ऎवजी शिंदे गटावर टिका करत असल्यामुळे पडळकरांचा दावा महत्वाचा ठरत आहे. विरोधी पक्षनेते पद न दिल्यामुळे पाटील नाराज आहेत.

जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर राजकीय विरोधक आहेत. पाटील पालकमंत्री असताना अनेकदा जिल्हा नियोजन बैठकीत त्यांच्यात वाद झालेले आहेत. असे असताना पडळकरच पाटील भाजपात येणार असल्याचा दावा करत असल्यामुळे जयंत पाटील खरच भाजपात येणार की हा फुसका दावा ठरणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!