लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात नवविवाहित महिलेची आत्महत्या
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात खळबळ, सासरच्यांची ती मागणी जीवावर बेतली, प्रज्ञासोबत नेमके काय घडले?
पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात
इंद्रायणी नदीच्या पात्रात उडी घेऊन नवविवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. तिचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. सोमवारी ही घटना घडली होती. पण या प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे.
प्रज्ञा कौशल भोसले असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा ही इंदोरी येथे इंद्रायणी नदीत सोमवारी बुडाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला. या घटनेबाबत सासरच्या मंडळींविरोधात छळाबाबत प्रज्ञाचा भाऊ प्रतीक चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली होती. रणजित जाधव या प्रकरणाचा तपास करत होते. पोलीसांनी तिच्या सासरच्यांकडे चाैकशी केली असता छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्ञाचा काैशल भोसलेबरोबर ११ मेला विवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसातच तिला दुचाकी आणि सोन्याची चेन आण म्हणून तगादा सुरू केला. पण तिच्या माहेरची परिस्थिती हालाखिची होती, त्यामुळे ते असमर्थ होते. त्यामुळे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला. पण तो त्रास असह्य झाल्याने प्रज्ञाने आत्महत्या केली. लग्नाच्या अवघ्या दीड महिन्यातच तिची दुर्दैवी अखेर झाली.
पोलीसांनी तातडीने कारवाई करीत काैशल भोसले याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत आणि पथकाने ही कारवाई केली आहे.