पत्नीमुळे या क्रिकेटपटूला अटक होण्याची शक्यता
चार वर्षे जुन्या प्रकरणाची पुन्हा होणार सुनावणी, पत्नीच्या याचिकेवर सर्वोच्च निर्णय, बघा प्रकरण काय?
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने एका महिन्यात सुनावणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शमीच्या अडचणी वाढल्या आहेत.कसरण गेल्या चार वर्षापासून या याचिकेबाबत विलंब होत आहे.
हसीन जहाँच्या खटल्याची गेल्या चार वर्षांपासून सुनावणी झालेली नाही. न्यायालयाने नमूद केले की अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, अलीपूर यांनी २९ ऑगस्ट २०१९ रोजी अटक वॉरंट जारी केले होते. या आदेशाला शमीने सत्र न्यायालयासमोर आव्हान दिले होते, त्यावर ९ सप्टेंबर २०१९ रोजी अटक वॉरंट आणि सुनावणीला स्थगिती दिली होती.” पण आता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नृसिंम्हा, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठाने शमीच्या पत्नीच्या याचिकेवर लक्ष देण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले की हे शक्य नसल्यास सत्र न्यायाधीश त्यात बदल करण्यासाठी कोणताही स्थगितीचा आदेश देऊ शकतात. हसीन जहाँने कलकत्ता उच्च न्यायालयाच्या २८ मार्च २०२३ च्या आदेशाला आव्हान दिले आहे, ज्यामध्ये सत्र न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवण्याची तिची याचिका फेटाळण्यात आली होती. आता हसीन जहाँने आरोप केला आहे की शमी तिच्याकडे हुंडा मागायचा. आता सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण एका महिन्यात निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे आता त्याच्यावर अटकेची टांगती तलवार असणार आहे.
सध्याच्या प्रकरणात गेल्या चार वर्षांपासून कोणत्याही वाजवी कारणाशिवाय फौजदारी खटल्याला स्थगिती देण्यात आली आहे, शमीने फौजदारी खटल्याला स्थगिती देण्यासाठी अपीलही केले नव्हते. त्याने केवळ अटकेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. पण आता ती शक्यता मावळली आहे.