
बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन झाले आहे. जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या भव्य शपथविधी समारंभात विक्रमी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

नितीश कुमार यांच्यासोबत त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील २६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये भाजपचे १४ आणि जेडीयू कोट्यातील ८ मंत्र्यांचा समावेश आहे. २६ नवीन मंत्र्यांमध्ये एक मुस्लिम आणि तीन महिलांचा समावेश आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेले तीन आमदार देखील मंत्री झाले आहेत. समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह एनडीए शासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मोहन यादव, राजस्थानचे भजनलाल शर्मा आणि गुजरातचे भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते.


