Latest Marathi News

मुख्यमंत्रिपद जाणार म्हणून एकनाथ शिंदेंचे कुणीच ऐकत नाही

राज्यातील या नेत्यांचा मोठा दावा, मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांएैवजी दुसऱ्या नावाला पसंती?, चर्चांना उधान?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचे मंत्रीपद कधीही जाऊ शकते. तसेच अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात आता जयंत पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीपदाबाबत धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

जळगाव येथे आक्रोश मोर्चाचे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ते जळगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळी भूमिका घेतात, तर त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाहेर वेगळीच भूमिका जाहीर करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन एक भूमिका घ्यावी व तीन जनतेत जाहीर करावी. अशी मागणी पाटील यांनी केली आहे. यावेळी पत्रकारांनी जयंत पाटील यांना संजय राऊत यांच्या वक्तव्याचा आधार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद धोक्यात आहे का असा प्रश्न विचारला यावर जयंत पाटील यांनी मिश्किल उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदेंना संध्याकाळी व्यवस्थित झोप लागू द्या. तुम्ही का त्यांना त्रास देताय. ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. आता त्यांच्यानंतर कोण मुख्यमंत्री अशी चर्चा केली तर आता प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही. हे कधी जाणार म्हणून आयएएस, आयपीएस अधिकारी सुद्धा त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. सगळं सरकारच ठप्प होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत त्यांच्याबाबत अशा वावड्या उठवणं योग्य नाही. कोण कोण मुख्यमंत्री होणार याची यादी बरीच मोठी आहे. असे म्हणत शिंदे सरकारमध्ये काहीच आलबेल नसल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान शरद पवार यांनी राजीनामा देणे, नंतर आंदोलन करणे हे ठरलेले असल्याचे विधान अजित पवार यांनी केले याबद्दल जयंत पाटील यांनी त्याच्याविषयी मला काही माहिती नाही. आंदोलन, राजीनामा असं काही ठरलेलं नव्हतं. आंदोलन करा असं कोणी कोणाला आदेश दिले नव्हते असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवारांच्या  गौप्यस्फोटांबाबत आपण योग्य वेळ आली की बोलणार असल्याचे जयंत पाटलांनी यावेळी सांगितले. बऱ्याच गोष्टींची कामात केलेल्या कृत्यानंतर स्पष्टीकरण देण्याची प्रत्येकाची पद्धत असते. त्यामुळे अजितदादांनी जे काम केले, कृती केली त्यासाठी अधून-मधून ते भाषण करून स्पष्टीकरण देतात. असे म्हणत अजित पवार यांना टोला लगावला आहे. दरम्यान जयंत पाटील यांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या पदावर चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!