Latest Marathi News
Ganesh J GIF

शिरुर लोकसभेतून अमोल कोल्हे नाही तर हा असणार राष्ट्रवादीचा उमेदवार

ठाकरेंवर टिका करताना शिवाजीराव आढळराव यांचा मोठा गाैप्यस्फोट

पुणे दि १२ (प्रतिनिधी)- शिवसेनेने माझा हक्काचा शिरूर लोकसभा मतदारसंघ सोडून मला पुणे  मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करा,असे सांगितले. शिरूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे आंदण देण्याचा हा प्रकार आहे. २०२४ ला मला दुसऱ्या मतदारसंघात पाठवून शिरुरमधून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याएैवजी पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचा गाैप्यस्फोट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.

आढळराव पाटील सध्या शिरुर मतदारसंघाच्या दाै-यावर आहेत.यावेळी ते म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकाच्या मागील गेल्या अडीच वर्षांत शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. यापुढे मला खासदारकी किंवा इतर कोणतेही पद महत्वाचे नसून माझ्या शिवसैनिकांची कामे मार्गी लागली पाहिजेत. शिरूर लोकसभा मतदार संघातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे.मला शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरण्याबाबतही निर्बंध घालण्यात आले होते. एक प्रकारे शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीला आंदण देण्याचा हा प्रकार होता. मात्र, मला दुसरीकडे पाठवून त्यांना पार्थ पवार यांच्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित करायाचा आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी करत राज्याचे मुख्यमंत्रीपद पटकावले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा देणारा संदेश आढळराव यांनी सोशल मीडियातून प्रसिद्ध केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची समजूत काढत पुण्यातून लढण्यास सांगितले गेले. त्यामुळे आढळराव यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेगटात प्रवेश केला

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!