अजित पवार गटाच्या महिला नेत्यावर सोशल मिडीयावर अश्लील कमेंट
अश्लील कमेंट करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल, अजित पवार गटाच्या नेत्यांना धमक्या व ट्रोलिंग
पुणे दि १२(प्रतिनिधी)- महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत फेसबुक, यूट्यूबवर अश्लील कमेंट करणे सात जणांना भोवले आहे. कमेंट करणाऱ्या ७ जणांविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्या या तरुणांमध्ये वकिलांचा देखील समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदार आणि नेत्यांना आता टार्गेट केले जात आहे. रुपाली चाकणकर यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत असताना वकील विजय कुमार सारखे आणि नितीन पाटील यांनी आक्षेपार्ह कमेंट्स केल्या होत्या. दुसऱ्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिकची सभा सुरू असताना एका युट्यूब चॅनलवर देखील धनराज विश्वकर्मा या व्यक्तीने रुपाल चाकणकर यांच्यविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. तर आरपीएम आणि राज वाडे यांनी देखील त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर युवराज चव्हाण यांच्या तक्रारीनंतर रुपाली चाकणकर यांच्याबाबत यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडखोरी केलेल्या आमदार आणि नेत्यांना आता टार्गेट केले जात आहे. या नेत्यांना धमक्यांचे फोन येत आहेत. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले होते. दरम्यान चाकणकर यांच्याविषयी सोशल मिडियामद्धे अश्लील मजकूर पोस्ट करणाऱ्या खात्याची तांत्रिक पडताळणी पोलिसांनी सुरू केली आहे.
रूपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेट. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. अजित पवार यांचा मेळाव्यात केलेल्या भाषणामुळे रूपाली चाकणकर या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टिका केली होती.