Latest Marathi News
Ganesh J GIF

‘अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव, कसा मतांनं उधळून टाकलाय डाव’

आमदार रवींद्र धंगेकरांवरील नवे गाणे घालतेय धुमाकूळ, व्हायरल गाणे एैकाच

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुण्यातील कसबाची पोट निवडणूक चांगलीच गाजली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात चुरशीची लढत होती. यात भाजपाचा बालेकिल्ला धंगेकर यांनी खेचून आणला होता. यावर एक गाणे करण्यात आले आहे.

राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गाण्याने कसब्यासह पुण्यामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ‘एकजुटीनं… साऱ्यांच्या मतानं.. कसा उधळून लावलाय डाव.. अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव’ असे बोल असलेले गाणे चांगलेच व्हायरल झाले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना या गाण्यातून टार्गेट करण्यात आले आहे कारण पोट निवडणूकीची प्रचार सुरु असताना पाटील यांनी धंगेकर यांच्यावर टिका करताना ‘हू इज धंगेकर’ असे म्हणत हिनवले होते. त्यावर आमदार धंगेकर असे म्हणत प्रत्युत्तर देणारी बॅनरबाजी देखील करण्यात आली होती. त्यानंतर पाटील यांनी धंगेकर यांच्या विजयानंतर त्यांचे अभिनंदन केले नव्हते. या गाण्याचे गायक प्रदीप कांबळे आहेट तर उमेश -प्रदीप यांनी हे गीत लिहिले आहे. पण यात अप्रत्यक्षपणे राजकीय शेरेबाजी करण्यात आल्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. पण या गाण्यामुळे महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सरकारवर व्यंगात्मक टीका करणाऱ्या रॅपर राज मुंगासे आणि रॅपर उमेश खाडे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे राज्य सरकारवर प्रचंड टीका झाली. आता लोकप्रिय होत असलेल्या या गाण्यावर सरकार काय भूमिका घेणारे हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!