
मोठी बातमी! या तारखेपासून ओला उबेर रॅपिडोची सेवा बंद
न्यायालयाचा महत्वाचा निर्णय, अनेक चालक होणार बेरोजगार, बंदीमागे नेमके कारण काय?
बंगरुळू – आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ओला, उबर आणि रॅपिडो हे अॅप असते. माफक दर आणि जलद सेवा यामुळे अनेकांनी त्या सेवेला फांदी दिली आहे. पण आता लवकरच या सेवा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्नाटक न्यायालयाने १६ जून २०२५ पासून कर्नाटकात ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अॅप-आधारित बाईक टॅक्सी चालणार नाहीत. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना राज्यात काम करणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, जोपर्यंत राज्य सरकार मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत बाईक टॅक्सींसाठी स्पष्ट नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करत नाही तोपर्यंत या सेवा चालवण्यास परवानगी दिली जाणार नाही. या निर्णयाचा परिणाम बेंगळुरू तसेच राज्यातील इतर शहरांमध्ये टॅक्सी वापरणाऱ्या लाखो प्रवाशांवर होईल. तसेच, हा निर्णय चालकांसाठीही मोठा धक्का आहे. एप्रिल २०२५ मध्ये, कर्नाटक उच्च न्यायालयाने बाइक सेवा देणाऱ्या या कंपन्यांना १५ जूनपर्यंत बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवण्याची अंतरिम परवानगी दिली होती. तथापि, न्यायालयाने आता ही सवलत वाढविण्यास नकार दिला आहे आणि १६ जूनपासून कामकाजावर बंदी घातली आहे. कर्नाटक सरकारने २०२१ मध्ये इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी योजना सुरू केली होती, परंतु सुरक्षितता आणि नियमांच्या अभावामुळे मार्च २०२४ मध्ये ती मागे घेण्यात आली. या बंदीचा परिणाम राज्यातील ६ लाखांहून अधिक लोकांच्या उपजीविकेवर होण्याची शक्यता आहे.
न्यायमूर्ती बी.एम. श्याम प्रसाद यांच्या खंडपीठाने सांगितले की, जोपर्यंत राज्य सरकार मोटार वाहन कायद्याअंतर्गत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करत नाही, तोपर्यंत राज्यात या सेवा चालवल्या जाणार नाहीत. न्यायालयाने सरकारला नियम बनवण्यासाठी ३ महिन्यांचा वेळ दिला आहे.