राष्ट्रवादीच्या फक्त त्याच लोकांना तिकीट मिळणार; विधानसभेबाबत अजितदादांचं मोठं वक्तव्य, इच्छूकांची धाकधूक वाढली
पुणे – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सोमवारी वाढदिवस आहे, पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
भावी मुख्यमंत्र्यावर प्रतिक्रिया
दरम्यान नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले आहेत. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लागले म्हणून कोणाला त्रास व्हायचं काही काम नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो म्हणून ते पोस्टर लावतात. मात्र मुख्यमंत्री असंच होता येत नाही. त्यासाठी पक्षाकडे 145 चा आकडा लागतो. ज्या पक्षाकडे हा आकडा आहे, त्यांचा मुख्यमंत्री होतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.