Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याला राष्ट्रवादीतुनच विरोध?

अजित पवारांना पर्याय म्हणून या नेत्याच्या नावाची चर्चा, राष्ट्रवादीत नेमकं काय चाललयं?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात जणू मुख्यमंत्री होण्याची स्पर्धाच लागली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण, हे सांगत नवीन चर्चेला सुरुवात केली आहे. पण त्यामुळे पक्षातील दोन गट समोर आले आहेत. याचीही चर्चा होत आहे.

अजित पवार भाजपासोबत जात मुख्यमंत्री होणार अशी चर्चा काही दिवसापूर्वी सुरु होती. त्यानंतर अजित पवार यांनी संधी मिळाली तर आत्ता मुख्यमंत्री होऊ शकतो असे वक्तव्य करत आपली दावेदारी सिद्ध केली होती. पण अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यावरुन पक्षातच मतभिन्नता असल्याचे समोर आले होते. पण खासदार अमोल कोल्हे यांनी मात्र मुख्यमंत्री पदासाठी वेगळेच नाव सुचवले आहे. कोल्हे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचं सर्वाधिक वेळ अर्थमंत्री पद जयंत पाटील यांनी भूषवलं. त्यामुळं त्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वांत आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो. जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची आज राज्याला मुख्यमंत्री म्हणून अत्यंत गरज आहे, असं कोल्हे म्हणाले आहेत. पण कोल्हे यांनी जयंत पाटील यांचा उल्लेख भावी आदर्श मुख्यमंत्री केल्याने राष्ट्रवादीत अजित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्यात सुप्त संघर्ष असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोणाला ती संधी देतात हे पाहणेही तेवढेच महत्वाचे आहे. पण कोल्हे यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या नावाला सर्वसंमती नसल्याचंही अधोरेखित झालं आहे.

राज ठाकरेबद्दल बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे लोकशाहीबद्दल अत्यंत समर्पक बोलले. त्यामुळे मी त्यापलिकडे जाऊन बोलणं योग्य नाही. हिंदुत्वाबद्दलची राज ठाकरे यांची लाईन मला आवडली. त्यांनी हिंदुत्वाची परिभाषा नेमकेपणाने मांडली. मला त्यांची ही परिभाषा आवडली, असंही कोल्हे म्हणाले आहेत. त्यामुळे अमोल्हे कोल्हे नेमके कोणाचे याची देखील चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!