Latest Marathi News
Ganesh J GIF

संतापजनक! बीडमध्ये एकाला नग्न करत बेदम मारहाण

बीडमध्ये चाललय काय? व्हिडिओ व्हायरल, धसांचा कार्यकर्ता म्हणतो, म्हणून मी मारल कारण...

बीड – बीडमध्ये सतीश भोसले या कुख्यात गुंडाचा अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. गुंड सतीश भोसले हा एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

आठ दिवसांपुर्वी बाबी ता. शिरूर येथील ढाकणे नावाच्या व्यक्तीला या सतीश भोसले नावाच्या गुंडाने मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे. एका व्यक्तीला अमानुष मारहाणाची व्हिडीओ समोर आल्यामुळे खळबळ उडाली. हा व्हिडीओ भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी सतीश भोसले याचा असल्याचं उघड झाले आहे. पण हा व्हिडिओ अडीच वर्ष जुना आहे. छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली होती, असे स्पष्टीकरण भोसलेने दिले आहे. सदरील व्हिडीओ चुकीचा असून तो दोन वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या मित्राच्या कुटुंबातील महिलेची छेड काढल्याने मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मारले. मला राग अनावर झाला नाही त्यामुळे मी त्याला मारहाण केली. त्या महिलेने सांगितलं. त्यामुळे मी त्याला तिथे मारहाण केली होती, अशी कबुली भोसलेनं दिले आहे. राधेश्याम भोसले असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. कौटुंबिक वादातून सतीश भोसलेकडून अमानुष मारहाण केली होती. सतीश भोसले(उर्फ खोक्या, पार्टी) हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. पण या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पण संबंधित व्यक्तीला कपडे काढून मारहाण केली होती. हे अत्यंत धक्कादायक असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. तसेच मारहाणीचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.

सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील तो रहिवासी आहे. भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. संबंधित गुन्ह्यासह याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!