
संतापजनक! पुण्यात शिवसृष्टीच्या गेटवर केली लघुशंका
व्हिडीओ व्हायरल होताच कार्यकर्ते आक्रमक, आंदोलनाचा इशारा, नेमक घडल काय?
पुणे – पुण्यातील आंबेगाव परिसरात असणाऱ्या शिवसृष्टीच्या गेटवर एका व्यक्तीने लघुशंका केली. या व्यक्तीचा लघुशंका करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी, लॉ कॉलेज रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असलेल्या स्मारकाबाहेरील सूचना फलकावर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आणि त्याच्या पत्नीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अपमान करणाऱ्या या कृत्यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर विविध संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. काही कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी मोर्चा काढण्याची चेतावणी दिली आहे. तक्रारदार अमराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ३ च्या सुमारास ते आणि त्यांचा मित्र अभिजीत सितापुरे नवले ब्रिजवरून परतत असताना शिवसृष्टीच्या मुख्य गेटसमोर दोन चारचाकी वाहने उभी असल्याचे दिसले. यावेळी एका राखाडी रंगाच्या अल्टो गाडीजवळ एक वयस्कर व्यक्ती सूचना फलकावर लघुशंका करताना दिसली, तर एक महिला मोबाइल हातात घेऊन शेजारी उभी होती. ही घटना अक्षय गायकवाड यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली. तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांनी याबाबत विचारणा केली असता, सदर व्यक्तीने आपले नाव अमोल अरुण कुलकर्णी आणि गाडीत बसलेली महिला त्यांची पत्नी स्नेहा अमोल कुलकर्णी असल्याचे सांगितले. त्यांनी उर्मटपणे “काय करायचे ते करा” असे उत्तर दिले. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि दोघांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणले. यावेळी व्यक्तीने उर्मट उत्तरे दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली असून, संबंधित व्यक्तींवर सार्वजनिक ठिकाणी घाण करण्यासंदर्भात भारतीय दंड संहितेनुसार कलमाखाली कारवाई केली जात आहे. पुणे शहर पोलिसांकडून या प्रकरणी गंभीर दखल घेतली गेली असून पुढील तपास सुरू आहे.