
देव दर्शनासाठी जाताना दुचाकीत पदर अडकला आणि…
विवाहित महिलेसोबत घडल भयंकर, अकरा महिन्याच्या चिमुकलीचा आक्रोश मन हेलवणारा
अकोला- अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे इथं एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका विवाहित महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पल्लवी आशिष नवलकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी नवलकरचा विवाह चार वर्षांपूर्वी अकोल्यातील दहिगाव गावंडे येथील आशिष नवलकर यांच्यासोबत झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. पल्लवी पती आशिष बरोबर मंगळवारी अकोल्यातीलच दोनद येथील आसरा देवीच्या दर्शनाला दुचाकीने निघाले होते. वाटेत कानशिवणी गावाजवळ पल्लवीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकला आणि पल्लवी दुचाकीवरून खाली कोसळली. खाली कोसळताच पल्लवीच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच ११ महिन्याची मुलगी देखील खाली कोसळली. यानंतर दोघांनाही तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरु असतानाच पल्लवीने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.
आईचा मृत्यू झाल्यानंतर अकरा महिन्याच्या चिमुकलीने भूक लागल्यानंतर केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. पल्लवी नवलकर यांचा अशाप्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.