पाकिस्तान न्यूझीलंड सामन्यातील मिस्ट्री गर्ल सापडली
पाकिस्तानच्या विजयापेक्षा तिच्या सुंदरतेचीच चर्चा, फोटो व्हायरल
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- टी-20 वर्ल्ड कपमधील भारताचा प्रवास थांबला असला तरी पाकिस्तान मात्र अंतिम फेरीत पोहोचला आहे. पाकिस्तान अंतिम सामन्यात इंग्लड बरोबर लढणार आहे. पण पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला चिअर करणारी एका मिस्ट्री गर्ल्स शोध लागला आहे. ती तरुणी सोशल मिडीयावर खूपच फेमस झाली आहे.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात ही तरूणी कधी फ्लाइंग किस देताना दिसली तर कधी हात उंचावून पाकिस्तानी टीमला प्रोत्साहन देताना दिसली. कॅमेरामनही वारंवार त्या तरुणीवर फोकस करत होता. त्यामुळे पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचल्या त्यापेक्षा या तरुणीचीच चर्चा जास्त होत आहे. तर फेमस झालेल्या तरूणीचे नाव नताशा असून ती मूळची पाकिस्तानी आहे. मात्र, तिचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आणि तिथेच ती मोठी झाली. नताशा सध्या मेलबर्नमध्ये राहते. तिच्या इंस्टाग्राम बायोवर तिने स्वतःला ऑस्ट्रेलियन पंजाबन लिहिले आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर तिची लोकप्रियता खूपच वाढली आहे. १,५०० फॉलोअर्स आता ३५ हजारांहून अधिक झाले आहेत. नताशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये तिने तिचा खरा आयडी उघड केला. तिचे फाॅलिअर्स सध्या वाढत आहेत.
पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना न्यूझीलंडशी झाला. या सामन्यात पाकिस्तान न्यूझीलंडला पराभूत करुन थेट फायनलमध्ये पोहोचला आहे. पण यावेळी सामन्यापेक्षा नताशाच मोस्ट फेव्हरेट ठरली होती.