Latest Marathi News
Ganesh J GIF

६ पासपोर्टबद्दल पाकिस्तानी सीमा हैदरनं केला मोठा खुलासा

वी दिल्ली – पाकिस्तानी सीमा हैदर प्रकरणी UP ATS नं तपास पूर्ण केला आहे. आता सीमा आणि सचिन नोएडाच्या त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. त्यात आता सीमाबाबत अनेक खुलासे समोर आले आहेत. सीमाकडे ६ पासपोर्ट आहेत. त्यातील ४ मुलांचे पासपोर्ट असल्याचे सीमानं म्हटलं. तर २ सीमाचे आहेत. त्यातील १ पासपोर्ट रद्द करण्यात आला, ज्यावर केवळ सीमा असं नाव लिहिलं होते. तर दुसरा पासपोर्ट पात्र असल्याचे बोलले जाते.

सीमा हैदरने सांगितले की, एका पासपोर्टवर माझे आडनाव नव्हते. त्यात ना गुलाम लिहिलं होते ना अली. केवळ सीमा होते. त्यामुळे तो पासपोर्ट रद्द झाला. त्यानंतर मी दुसरा पासपोर्ट बनवला. त्यात पूर्ण नाव लिहिलं आहे. म्हणजे सीमा गुलाम हैदर. हे दोन्ही पासपोर्ट माझ्याकडे आहेत. त्याचा अर्थ मी गुप्तहेर आहे असं होत नाही. मी हे लपवूनही ठेवले असते. माझ्या बोलण्यावर कुणी विश्वास ठेवत नाही या गोष्टीचे मला दु:ख आहे. मी केवळ सचिनसाठी भारतात आले. सचिनने म्हटलं हिंदुस्तानातील लोक चांगले आहेत. मलाही येथील लोक आवडतात. परंतु माझ्याकडे वारंवार संशयाच्या नजरेने पाहिले जाते त्याने खूप वाईट वाटते असं ती म्हणाली.

पाकिस्तानातून थेट भारतात यायचे होते…

सीमाने पुढे सांगितले की, पाकिस्तानात प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात. मला पासपोर्ट काढण्यासाठी कितीतरी खर्च आला. मला थेट भारतात यायचे होते. पण माझा व्हिसा मंजूर झाला नाही. ज्यामुळे मला नेपाळमार्गे भारतात यावे लागले. मी भारतात थेट येण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु पाकिस्तानातून असल्याने मला व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे मजबुरीने मला नेपाळच्या रस्ते भारतात आले. हाच माझा गुन्हा आहे असं तिने कबुल केले. तसेच माझी भारताच्या डिटेन्शन सेंटरमध्ये तुरुंगात राहण्याची तयारी आहे. पण मला कोणत्याही किंमतीवर पाकिस्तानात परत जायचे नाही. एटीएसच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर दोन दिवसांनी सीमा सचिनच्या घरी परतली आणि म्हणाली की पाकिस्तानात पाठवले तर तिला ठार मारले जाईल.

लग्नाचा व्हिडिओ बनवला नाहीत्यामुळेच पुरावा नाही

सीमा हैदरने नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातच प्रियकर सचिनसोबत लग्न केल्याची कबुली दिली. मंदिराच्या मागच्या भागात सचिनशी लग्न झाले, कारण समोर खूप गर्दी होती. सीमाने असा दावाही केला की, हार घालण्याचा आणि सिंदूर भरण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही? म्हणूनच त्या लग्नाचा पुरावा देऊ शकत नाही. पण हो, लग्न नेपाळमधील हॉटेलमध्ये नाही तर मंदिरात झाले.

दरम्यान, मी दोषी आढळल्यास मला शिक्षा मान्य आहे. जर मी निर्दोष सिद्ध झाले तर कृपया मला इथेच राहू द्या कारण पाकिस्तानात परतणे माझ्यासाठी मृत्यूशिवाय दुसरे काही नाही. माझ्यावर मोठे आरोप केले जात आहेत, त्यामुळे मला पाकिस्तानात मारले जाईल असंही सीमा हैदरने म्हटलं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!