पांगरी येथील स्व.शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल मध्ये बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा रक्षाबंधन सण उत्सव साजरा
पांगरी येथील स्व.शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूलमध्ये बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीला जगात खूप महत्व आहे कारण ही तसेच आहे. बहिण-भावाच्या नात्यातील कर्तव्यरक्षक भाव असलेली संस्कृती असलेला एकमेव देश आहे. स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा. असा महान संदेश देणाऱ्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण आपल्या कुटुंबापुरतेच न ठेवता समाजातील नात्यात रक्षबंधनात उतरवण्याचे कार्य आमच्या शाळेतील रक्षाबंधन उत्सवात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
शाळेतील या उत्सवात मुलांचा उत्साह खूप आनंदी होता. भारतीय सण-उत्सवाची अतोनात माहिती आतापासून बालवयात मुलांवर रुजविण्याचे कार्य ही शाळा करत आहे. कार्यक्रमासाठी चव्हाण मॅडम, भालेराव मॅडम, पालखे मॅडम, गाडेकर मॅडम, जगदाळे मॅडम, कांबळे मॅडम, चांदणे मॅडम,घावटे मॅडम, काकडे मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम विनायक गरड सर ,पाटील सर व शेख सर तसेच इतर कर्मचारी यांच्या उपस्थित झाला