मुंबई दि २३(प्रतिनिधी)- भाजपा नेत्या पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. पक्षाकडून सतत डावलले जात असल्याची खंत त्यांनी बोलूनही दाखवली होती. राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद तरी दिलं जावं अशीगी मागणी करण्यात आली होती. मात्र यापैकी काहीच न घडल्यानं पंकजा मुंडे यांनी थेट राजकारण सोडल अशी चर्चा रंगली लागली आहे.
पंकजा मुंडे यांनी राजकारण सोडल्याची चर्चा होण्याचे कारण म्हणजे झी मराठी वरील उंच माझा झोका या पुरस्कार सोहळ्याचं पंकजा मुंडे चक्क निवेदन करताना दिसणार आहेत.यामध्ये त्यांच्यासोबत क्रांती रेडकर दिसणार आहेत. मुंडे रंगमंचावर दिसणार असल्यामुळे त्या राजकारणातून बाहेर पडणार का?अशी चर्चा सुरु झाली आहे.याचे उत्तर या सोहळ्यात मिळण्याची शक्यता आहे.उंच माझा झोका’ पुरस्काराचे यंदाचं हे आठवं वर्ष आहे. आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला जातो.पण या सोहळ्याचे पंकजा मुंडे निवेदन करणार म्हटल्यावर वेगळीच चर्चा रंगली आहे.
हा पुरस्कार सोहळा झी मराठी वर २८ ऑगस्टला संध्याकाळी ७ :०० वाजता आपण पाहू शकाल.पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर ह्या दोघींची जुगलबंदी ह्या कार्यक्रमात रंगत आणेल ह्यात शंकाच नाही.