Latest Marathi News
Ganesh J GIF

पालकांनो मुलांना सांभाळा, शाळेत खेळताना मुलगा पडला अन् नको ते घडल..!

पिंपरी चिंचवडमधील काळेवाडीत राहणारा सार्थक कांबळे हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात होता. बाराच्या सुमारास तो तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. पण रेलिंगवर घसरगुंडी खेळणे धोकादायक होते. त्याला याची कल्पना एका मित्राने दिली. तू येथे खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेल, असे म्हणत त्याला रेलिंगवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र सार्थक कांबळे त्याने तो ऐकला नाही. तो त्याच्याच धुंदीत होता. यावेळी अचानकपणे त्याचा तोल गेला अन तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये पडला. सार्थक कांबळे हा शाळेत जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळत होता

रुग्णालयात नेले पण…

सार्थक कांबळे पडल्यावर शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. त्याच्या पालकांना घडलेली घटना सांगितली. या अपघातात सार्थक कांबळे याला जोराचा मार लागला. रुग्णालयात तातडीने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. सार्थक याला मित्रांनी दिलेला सल्ला ऐकला असता तर ही दुर्देवी घटना घडली नसती. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शाळेत गेल्यावर मुलगा परत येईल, अशी वाट पाहणाऱ्या सार्थकच्या पालकांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर शाळेत मुले शिस्त पाळतात की नाही, यावर शिक्षकांनी लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!