Latest Marathi News
Ganesh J GIF

युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी आयोजित ‘मिस्टर, मिस, किड्स महाराष्ट्र २०२४ सीझन ५’ चा समारोप

पुणे : युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी आयोजित ‘मिस्टर, मिस, किड्स महाराष्ट्र २०२४ सीझन ५’ चा समारोप पुण्यातील कुमार पॅसिफिक मॉल येथे संपन्न झाला. या समारोपाचे यंदाचे ५वे वर्ष होते. पुण्यात रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्यात चित्रपट सृष्टीसह फॅशन, बिजनेस, डॉक्टर, पत्रकार, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटीचे आयोजक उद्धव खरड, ग्रुमर आणि कोरियोग्राफर नरेश फुलेल्लू, ईशा राजे, क्षितिज गायकवाड, अनिल पाचंगे ज्यूरी काजल कोरडे, सोनाली कणखरे, श्रुतिका लोंढे, गेस्ट मॉडेल चंदना जगदना, धनश्री ढमाले, किंजल राठोड, वेदांत ठोंबरे, तन्वी मुळे, शिवतेज शिंदे , अँकर  ऐश्वर्या सोलास उपस्थित होते. फॅशन पार्टनर म्हणून मॅक्स, शॉपर्स स्टॉप, ट्रेंड वुमन, पँन्टालून आणि फॅशन डिझायनर मेजर टेक्सटाइल, एकता बागडे, मीनू सोनी हे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील, यश, तुषार चाचर, तनु भोसले, डॉ. ज्योती बोरसे, सारंग चव्हाण यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या स्पर्धेचे विजेते अफ्रोज सय्यद (मिस्टर महाराष्ट्र-२०२४), बुद्धीसा रायसोनी (गोल्ड मिस महाराष्ट्र-२०२४) आयुशी सिंह (डायमंड मिस महाराष्ट्र-२०२४) शुभ्रा बागल (किड्स महाराष्ट्र-२०२४)

कार्यक्रमात उपस्थितांनी अनुभवली ‘आतिशबाजी’

युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी निर्मित आणि उद्धव खरड प्रोड्युसर असलेले ‘आतिशबाजी’ हे गाणे चाहत्यांसाठी प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यावर उपस्थित सर्व लोकांनी ठेका धरत मनमुरादपणे डान्स केला.

‘आतिशबाजी’गीतासाठी कोणाचे योगदान?

शीर्षक – आतिषबाजी, निर्माता – उद्धव खरड (यूएसएसक्वेअर मीडिया आणि प्रसिद्धी), दिग्दर्शक – अविनाश खोचरे पाटील, कोरिओग्राफर – अनिल पाचंगे, कलाकार – उद्धव खरड, श्रुतिका लोंढे, गायक – ब्रम्हानंद पाटणकर, छायाचित्रण संचालक – यश 11 छायाचित्रण संचालक असिस्टंट – प्रणय भोयर, महेश देवेकर, प्रोडक्शन मॅनेजर – शिवाय पुयेद, मेकअप आर्टिस्ट – किंजल राठोड, गीत – राहुल सूर्यवंशी, संगीत – संदीप भुरे, कलाकार कॉर्डिनेटर – धनश्री ढमाले, संपादक – प्रयाग अरु, सहयोगी संचालक – रवींद्र जाधव, क्रिएटिव्ह हेड – सारंग चव्हाण, ठिकाण भागीदार – हॉटेल अमराई 69, डान्सर्स – धनश्री ढमाले, श्रद्धा पाटील, तृप्ती पवार, चंदना जगदना, बुद्धीशा खंडारे ,ईशा राजे , अपूर्वा मोरे, आरती पुरोहित, प्रिया संगुदकर, ग्राफिक डिझायनर – विक्रेता ठोंबरे, प्रकाश विभाग – शर्मा सिने लाईट, सिद्धेश वरखडे, रवी दीक्षित, संतोष अंबुरे, अजय सिंग, मनोज शर्मा, विठ्ठल केंगार, निकिता गावडे, मानसी आवळे, सुप्रिया पाटोळे, गायत्री दळवी, भक्ति गवळी, आदित्या पवार, अंतिमा मिश्रा, वैभव राऊत, वैभव क्षिरसागर.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!