Latest Marathi News
Ganesh J GIF

पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ ठरला?

या मतदारसंघातून पार्थ पवार लढणार लोकसभा निवडणुक?, सेफ मतदारसंघाची चर्चा, यामुळे लढत चुरशीची होणार?

पुणे दि १४(प्रतिनिधी)- राजकारणात सध्या अनेक फेरबदल घडत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे कोण कोठून लढणार याची चाचपणी सुरु आहे. तर सध्या भाजपाने बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पण बारामती आणि शिरुरच्या जागेवर अजित पवार गटाकडून दावा केला जात आहे. त्यातच पार्थ पवार यांचा मतदारसंघ डोक्याची चर्चा जोरात रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे. या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. पण अजित पवार १९९१ पासून जिल्हा बँकेचे संचालक होते.याआधीही ते उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री अशी जबाबदारी होती. पण आत्ताच राजीनामा देण्याचे कारण काय यावर चर्चा रंगली आहे. पण अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या राजकीय प्रवेशासाठी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक जाहीर केल्यानंतर ही निवडणूक लागणार आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून पार्थ पवार संचालक होणार आहेत. गेल्यावेळेस मावळमधून पराभव पत्कारावा लागल्यामुळे पार्थ पवार शिरुरमधून लढण्यासाठी उत्सुक आहेत. कारण आंबेगाव, जुन्नर, खेड, हडपसर या चार मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आणि ते अजित पवार यांच्या गटात आहेत. तर शिरूरचे आमदार अशोक पवार शरद पवार गटात आहेत. पण शिरुरचे अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत आहेत. तर दुसरीकडे भोसरीमधून भाजपाचे महेश लांडगे आमदार आहेत. त्यातच खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी देखील आहे. दुसरीकडे बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरूद्ध लढत झाल्यास शरद पवार यांना सहानुभूती मिळू शकते. त्यामुळे पार्थ पवारांसाठी शिरुर हा सेफ मतदारसंघ आहे. त्यामुळे २०१९ ला झुकलेली संधी २०२४ ला मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पार्थ पवार यांनी मावळमधून पराभव झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे तेंव्हापासूनच ते शिरुरमधून लोकसभा लढणार अशी चर्चा रंगली होती. पण शिंदे गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील दावा सांगण्याची शक्यता आहे. त्यातच शरद पवार यांनी लक्ष घातल्यास लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्थ पवार लोकसभेत दिसणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!