मोबाईल चोराची रेल्वेतील प्रवाशांनी केली चांगलीच फजिती
प्रवाशांनी चोरट्याला दिलेल्या शिक्षेचा थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
बिहार दि १६ (प्रतिनिधी)- चोरी करताना चोरटे अनेक कृप्त्या करतात हे आपण पाहिले आहे. पण अनेकदा निरनिरळ्या पद्धती त्यांच्या अंगलट येतात त्यामुळे त्यांची धुलाई तर होतेच शिवाय पोलीस कोठडीची हवा त्यांना खावी लागते.असाच एक बिहार मधील रेल्वेत चोरी करणा-या चोरट्याच्या फजितीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.प्रवाशांनी त्या चोरट्याला चांगलीच अद्दल घडवली आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ बिहारमधील बेगूसराय या ठिकाणचा आहे. साहेबपूर कमाल रेल्वे स्टेशनवर गाडी थांबलेली असताना एक चोर खिडकीमधून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करत होता.पण चोरी करताना त्याला प्रवाशांनी पकडले. त्यांनी त्याला पोलीसांच्या हवाली करण्यापेक्षा चांगलीच अद्दल घडवली. त्यांनी त्याला रेलवेच्या बाहेर टांगत फरफटत नेले. चोर त्यांना सोडण्याची वारंवार विनंती करत होता. पण प्रवाशी त्याला चोरी करण्याचा जाब विचारत होते. त्याला रेल्वेच्या बाहेर सांगत ठेऊन आतमध्ये त्याचे हात प्रवाशांनी पकडले होते. सुदैवाने तो खाली पडला नाही. पुढचे स्टेशन आल्यावर प्रवाशांनी त्याला पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
चोरी करणं हा गुन्हा आहे. मात्र तरी देखील काही मंडळी झटपट पैसा मिळवण्यासाठी चोरी करतात. पण या चोराला प्रवाशांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. यापुढे तो स्वत:च्या मोबाईलला देखील हात लावण्यापूर्वी हजारदा विचार करेल. अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकरी देत आहेत.