Just another WordPress site

पोलीस भरतीची तयारी करणा-या युवकाचे स्वप्न एसटीच्या पत्र्याने छाटले

बुलढाण्यातील मलकापूरात विचित्र अपघात,शेतकऱ्यासह तिघांना गंभीर दुखापत

बुलढाणा दि १६ (प्रतिनिधी) – प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे बुलढाण्यात एका तरूणांच्या स्वपासह तिघांना जखमी केले आहे. कारण एसटी बसचा बाहेर आलेल्या पत्र्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या शेतकऱ्याचा हात दंडापासून वेगळा झाला, तर पोलीस भरतीची तयारी करणारा युवकालाही आपला हात गमावावा लागला आहे. मलकापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

GIF Advt

मलकापूरवरून पिंपळगाव देवीकडे जाणाऱ्या या बसने आव्हा गावाजवळ तिघा जणांना गंभीर जखमी केले. यामध्ये ४५ वर्षीय शेतकरी परमेश्वर सुरडकर यांचा हात कापला गेला. तर त्याचवेळी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या दोन युवकांनांही जखमी केले. त्यात विकास गजानन पांडे याचा हात कापून धडावेगळा झाला आहे. ही बस मलकापूर डेपोची आहे. तर चालकाचे नाव देवराव भावराव सूर्यवंशी आहे. त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. पण दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. याअपघातानंतर संतप्त जमावाने मलकापूर डेपोत तोडफोड केली पण पोलीसांनी वेळीच त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

या अपघातामुळे खराब आणि कालबाह्य एसटी बसचा मुद्दा समोर आला आहे. ग्रामीण भागात अशा अनेक बस धावत असल्याने असे अपघात इतर ठिकाणीही घडण्याची शक्यता आहे.पण मलकापुरातील एसटीच्या बाहेर आलेल्या पत्र्यामुळे एका तरुणाच्या स्वप्नाचे पंखच कापल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!