Latest Marathi News
Ganesh J GIF

“पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली…” सुरेंद्र अग्रवालांची उच्च न्यायालयात धाव

कल्याणीनगर अपघात प्रकरणात चुकीच्या पद्धतीने केलेल्या अटकेसाठी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवून दोन तरुणांना उडविले.

पुणे पोलिसांनी ७७ वर्षीय सुरेंद्र अग्रवाल यांना २५ मे रोजी नातवाच्या गुन्ह्यासंदर्भात अटक केली. सध्या सुरेंद्र अग्रवाल हे न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्या दिवशी त्यांना ताब्यात घेतले, त्यावेळी येरवडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्वतंत्र कलमांतर्गत गुन्हे नोंदविले. यात आयपीसी कलम ३४२, ३६५, ३६८ आणि ५०६ अन्वये चालकाचे अपहरण, बेकायदेशीरपणे त्याला कैदेत ठेवणे आणि चालकाला धमकावणे याचा समावेश आहे.

पोलिसांनी अटक करण्यापूर्वी सीआरपीसी अंतर्गत ४१ अ अंतर्गत नोटीस देणे आवश्यक होते. मात्र ती देण्यात आलेली नाही. केवळ आरोपांच्या आधारे अग्रवाल यांना चुकीच्या पद्धतीने अडकवले गेले आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये नमूद केलेल्या कायदेशीर तरतुदींचे पालन करण्यात न आल्याने ही याचिका दाखल करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!