Latest Marathi News
Ganesh J GIF

लोकप्रिय अभिनेत्री लढवणार विधानसभेची निवडणूक

अभिनयानंतर राजकारणाच्या मंचावर एन्ट्री, या पक्षाकडून लढवणार निवडणूक, मतदारसंघ ठरला?

पटना – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षांतर्गत फाटाफुटीवर मलमपट्टी करण्याची मोहीम सुरू केली आहे. आगामी महिन्यात रंगणाऱ्या या चुरशीच्या लढतीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) तणाव कमी करून सामाजिक समीकरणे सुधारण्यावर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.

बिहारच्या राजकारणात नवीन चेहऱ्यांचा प्रवेश सुरू झाला आहे. पवन सिंह आणि मैथिली ठाकूर यांच्यानंतर आता प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग यांच्या राजकीय भेटीमुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. अक्षरा सिंगने केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यासोबत झालेल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे अक्षरा लवकरच भाजपाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर गायिका मैथिली ठाकूर हिला पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. बिहारच्या तरुण मतदारांमध्ये या दोन्ही कलाकारांचा चांगला प्रभाव असल्याने, त्यांचा राजकीय सहभाग पक्षाला लाभदायक ठरू शकतो, असे मानले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी विनोद तावडे व ऋतुराज सिन्हा यांनी भोजपुरी अभिनेता पवन सिंग आणि उपेंद्र कुशवाह यांची दिल्लीत भेट घडवून आणली. पवन सिंग यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत करकट मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार म्हणून लढत दिली होती, यामुळे एनडीएला या राजपूत बहुल क्षेत्रात फटका बसला होता. त्यामुळे भाजकडून पवन सिंग आणि अनेक कलाकारांना पक्षात घेत जातीय समीकरण जमवण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसत आहेत.

बिहार विधानसभा निवडणूक जाहीर होऊन तीन दिवस झाल्यानंतरही भाजप प्रणित एनडीए आणि महागठबंधन दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटप ावरुन गोंधळ सुरू आहे. त्यामुळे अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!