Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आली; टेन्शन कुणाचं वाढणार धंगेकर की मोहोळ ?

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं, यात पुणे लोकसभेच्या जागेचाही समावेश होता. पुण्यातल्या या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.पुण्यात यंदा 53.54 टक्के मतदान झालं आहे. 11 लाख 3 हजार 678 पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.पुण्यातल्या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांपैकी कसबा पेठेत सर्वाधिक मतदान झालं आहे. कसबा पेठेमध्ये 59.54 टक्के मतदान झालं तर शिवाजी नगरमध्ये सगळ्यात कमी 50.67 टक्के मतदान झालं.

पुणे लोकसभेचं विधानसभा निहाय मतदान

वडगाव शेरी – 51.71%

शिवाजीनगर 50.67%

कोथरूड 52.43%

पर्वती 55.47%

पुणे कॅन्टोन्मेंट 53.13%

कसबा पेठ 59.24%

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 41 हजार 817 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 41 हजार 133, कोथरूड विधानसभा मतदारसंघात 2 लाख 17 हजार 455, पर्वती विधानसभा मतदारसंघात 1 लाख 89 हजार 184, पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात 1 लाख 49 हजार 984 तर कसबा पेठेत 1 लाख 64 हजार 105 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.पुणे लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी प्रमुख लढत आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे रिंगणात आहेत. या तिघांपैकी पुण्याचा खासदार कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!