हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेश्या व्यवसायावर छापा
गुन्हे शाखा व 'सासु'ने केली दोन मुलींची सुटका, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
पुणे दि ९(प्रतिनिधी)- पुणे गुन्हे शाखेने सामाजिक सुरक्षा विभागाच्या मदतीने मोठी कामगिरी पार पाडली आहे. हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील रॉयल लॉजिंग वर छापा टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगीतील रॉयल लॉजिंग देविका प्लाजा हरपळे पार्क येथे वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवून वेश्या व्यवसाय चालत आहे. अशी माहिती गुन्हे शाखा व सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानंतर त्या लाॅजवर अधिकारी आणि पोलिस अमंलदार यांनी बनावट ग्राहक म्हणून पाठवून याची खात्री करण्यात आली. बातमीची खातरजमा झाल्यानंतर तात्काळ छापा कारवाई करून, या ठिकाणावरून दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. त्याचबरोबर लाॅजचे चालक आणि दोन मॅनेजर यांच्याविरोधात हडपसर पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील कारवाई करीता हडपसर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे कारवाई केलेला लाॅज हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो पण कारवाई मात्र गुन्हे शाखेने केल्यामुळे हडपसर पोलीस नेमके काय करत आहेत, त्यांना या प्रकाराची माहिती नव्हती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर हडपसर परिसरात अनेक अवैध गुन्हे वाढले आहेत त्यामुळे हडपसर पोलीसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त गुन्हे, पुणे, अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि. अश्विनी पाटील, सपोनि. अनिकेत पोटे, पोलिस अंमलदार, राजेंद्र कुमावत, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, रेश्मा कंक, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार या पथकाने केली आहे.