महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प लागणार मार्गी – स्वानंद कोंडोलीकर, सदस्य, ZRUCC, मध्य रेल्वे
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकलपांसाठी 15 हजार 544 कोटी रुपयाची भारी तरतूद
भारतीय रेल्वे ने पिंक बुक बजेट नुकतेचं प्रकाशित केले,भारतीय रेल्वेचे पिंक बुक अभ्यासले असता महाराष्ट्रातील रेल्वे साठी भारी तरतूद केले असल्याचे दिसून येते. भारतीय रेल्वेच्या अंतरीम बजेट मध्ये महाराष्ट्रातील रेल्वेला 15 हजार 544 कोटी रुपयाचा भारीव निधी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्राचा बहुतांश भाग मध्य रेल्वे अंतर्गत तर मराठवाड्याचा भाग दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत येतो. या अंतरीम बजेट चे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे कडूनही भरीव निधी मिळाला आहे. मराठवाड्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या छत्रपती संभाजी नगर -अंकाई (मनमाड) या 98 किमी रेल्वे मार्गाला 214 कोटी रु मंजूर करण्यात आले आहेत.तर अकोला -पूर्णा -नांदेड -सिकंदराबाद-दौण219 कोटी 99 लाख 98 हजार रु तरतूद करण्यात आले आहेत,मराठवाड्यासाठी आवश्यक असलेल्या लातूररोड रेल्वे मार्गासाठी 40 कोटी रु परळी वैजनाथ रेल्वेमार्गासाठी 40 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.अंकाई रेल्वेमार्गासाठी 20 कोटी तर मुदखेड बायपास मार्गासाठी 6 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. ह्याच बरोबर बहुचर्चित परळी -वैजनाथ -बीड-नगर साठी 275 कोटीची तरतूद केल्याचे बोलले जाते. नांदेड वर्धा यवतमाळ नवीन रेल्वे मार्गासाठी 750 कोटी रुपयांची तरतूद या बजेट मध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूर रेल्वे नकाशावर येण्यासाठी ही केंद्र सरकारने कंबर कसल्याचे दिसून आले. सोलापूर -तुळजापूर -धाराशिव या 84 किमी नवीन रेल्वे मार्गासाठी 225 कोटी रु तरतूद केल्याने हे काम ही मार्गी लागण्याचे बोलले जाते.
ह्या व्यतिरिक्त विदर्भासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या अकोला खंडवा महू गेज साठी 610 कोटी रु तरतूद करण्यात आली आहे. यावरून मध्य रेल्वे तसेचं दक्षिण मध्य रेल्वे या भागाला भरभरून निधी मिळाल्याचे दिसून येते. ह्यासोबतचं संपूर्ण महाराष्ट्रातील दौंड-मनमाड दुहेरीकरणासाठी 300 कोटी रु तर पुणे -मिरज -कोंढवा दुहेरीकरणाकरिता 200 कोटी रु, मनमाड -जळगांव तिसरी लाईन 120 कोटी रु, इगतपुरी मनमाड तिसरी लाईन 5 कोटी रु, वर्धा नागपूर तिसरी लाईन 125 कोटी 89लाख 99 हजार रु,वर्धा नागपूर चौथी लाईन 120 कोटी रु,नागपूर इटारसी लाईन 320 कोटी रु निधी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र ते गुजरातचे अंतर 85 किमीने कमी करण्याचा 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
भुसावळ वर्धा तिसऱ्या लाईन साठी 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. एकूण बघता महाराष्ट्रातील सर्वचं प्रभागामध्ये भरून निधी दिल्याने समाधान व्यक्त केल्या जात आहे.
रेल्वे मार्गाचे नांव.
1)नगर -बीड -परळी वैजनाथ
कामाचा प्रकार -(नवीन रेल्वेमार्ग ) बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(275 कोटी रु )
2)वर्धा -यवतमाळ -नांदेड
कामाचा प्रकार -(नवीन रेल्वेमार्ग )बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(750 कोटी रु )
3)सोलापूर -तुळजापूर -धाराशिव
कामाचा प्रकार -(नवीन रेल्वेमार्ग )
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(225 कोटी रु )
4)धुळे -नरडाणा
अंतर किमी- (34किमी )
कामाचा प्रकार- (नवीन रेल्वे मार्ग )
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(350कोटी रु )
5)बिदर -नांदेड
अंतर किमी -(155 किमी )
कामाचा प्रकार -(नवीन रेल्वेमार्ग )
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(1 हजार कोटी रु )
6)कल्याण -मुरबाड
कामाचा प्रकार -(नवीन रेल्वे मार्ग )
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद- (10 कोटी रु )
7) दौंड -मनमाड
कामाचा प्रकार -(दुहेरीकरण )
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(300 कोटी रु )
8)पुणे -मीरज लोंढा
कामाचा प्रकार -(दुहेरीकरण )
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(200 कोटी रु )
9)मनमाड -जळगांव
कामाचा प्रकार -(तिसरी लाईन )
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(120 कोटी रु )
10)इगतपुरी -मनमाड
कामाचा प्रकार -(तिसरी लाईन )
बजेट 2024-25 मध्ये निधीची तरतूद -(5 कोटी रु )
11)कल्याण -कसारा
कामाचा प्रकार- (तिसरी लाईन )
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(85 कोटी )
12)अंकाई -मनमाड -संभाजीनगर
कामाचा प्रकार- (दुहेरीकरण)
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(214 कोटी रु )
13)अकोला -पूर्णा -मुरखेड -ढोण
कामाचा प्रकार -(दुहेरीकरण)
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(219 कोटी 99लाख 98हजार रु )
14)वर्धा -नागपूर
कामाचा प्रकार- (तिसरी लाईन )
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(124 कोटी 89 लाख 98 हजार रु )
15) वर्धा -नागपूर
कामाचा प्रकार -(चौथी लाईन)
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(120 कोटी रु )
16)नागपूर -इटारसी
कामाचा प्रकार -(तिसरी लाईन )
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(320 कोटी रु )
17) वर्धा -बल्हारशा
कामाचा प्रकार -(तिसरी लाईन)
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(200 कोटी रु )
18)नागपूर -नागभीड
कामाचा प्रकार -(गेज परिवर्तन)
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(कोटी)
19) अकोला -खंडवा -महू गेज परिवर्तन
कामाचा प्रकार -(गेज परिवर्तन)
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(610 कोटी रु )
20) भुसावळ -अकोला -वर्धा
कामाचा प्रकार- (तिसरी लाईन )
बजेट 2024-25 साठी निधीची तरतूद -(100 कोटी रु )
– स्वानंद कोंडोलीकर,
सदस्य, ZRUCC, मध्य रेल्वे