Latest Marathi News
Ganesh J GIF

अहमदनगर मतदारसंघात सुजय विखे कुटुंबाकडून पैशांचा पाऊस’; निलेश लंकेंचे गंभीर आरोप; कारवाईची मागणी

तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या उमेदवाराने अहमदनगर मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी ट्विट करीत महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हीच का तुमची दोन दिवसाची यंत्रणा? असा सवाल निलेश लंके यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

निलेश लंके यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना सुजय विखे पाटील यांचे वडझिरे येथे पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले. आता तुम्ही ठरवा तुम्हाला चार-पाचशे रुपये देऊन तुमचा लोकशाहीचा अधिकार विकत घेणारा खासदार हवा का विकास करणारा, सामान्यांसाठी लढणारा हवा? असा सवाल त्यांनी मतदारांना केला आहे.अहमदनगर मतदारसंघात महायुती आणि मविआमध्ये जंगी लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातून शरद पवार गटात सामील झालेले निलेश लंके पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. कोरोना काळातील निलेश लंके यांच्या कामाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झालं होतं. तर दुसरीकडे भाजप नेते व विद्यमान खासदार सुजय विखे यांना पुन्हा एकदा पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. त्यातच

काय म्हणाले निलेश लंके?
बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली. परंतु या धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. भाजपच्या तालुकाध्यक्ष यांनी पैसे वाटताना लोकांनी रंगेहाथ पकडलं. त्याच्याकडून नऊ ते दहा लाख रूपये सापडले आहेत. सत्तेचा गैरवापर केला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!