राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली २०२३ची ‘मिस इंडिया’
'या' प्रश्नाचे उत्तर देत पटकावला किताब, मिस वर्ल्डमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- फेमिना मिस इंडिया २०२३ च्या स्पर्धेच्या विजेतीची काल घोषणा करण्यात आली असून राजस्थानची नंदिनी गुप्ता ही २०२३ ची मिस इंडिया स्पर्धेची विजेती ठरली आहे. या स्पर्धेत श्रेया पुंजा आणि स्ट्रॅल थौनाओजम लुवांग या फर्स्ट आणि सेकंड रनर-अप ठरल्या. मिस इंडिया स्पर्धेचे हे ५९ वे वर्ष आहे.
मिस इंडिया २०२३ ची विजेता नंदिनी गुप्ता ही राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी आहे. तेथूनच तिने शिक्षण घेतले आहे. तिने बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. तिने बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. लहानपणापासून फेमिना मिस इंडियाची विजेती बनण्याचे तिचे स्वप्न नंदिनी बघत होती. आता तिचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. नंदीनीला जर तुला काही ऑप्शन दिले तर तिला काय बदलायला आवडेल, पहिलं जग की दुसरं स्वतः असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी नंदिनीने तुमच्यात स्वतःला बदलण्याची ताकद असेल तर तुम्ही जग बदलू शकता. असे उत्तर देत सर्वांची मने जिंकली. याआधीही ती फेमिना मिस इंडिया राजस्थानची विजेती ठरली आहे होती. मिस इंडिया स्पर्धेत नंदिनी गुप्तानं ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये रॅम्प वॉक केला. गेल्या वर्षीची मिस इंडिया सिनी शेट्टी हिने नंदिनीला क्राउन घातला. नंदिनी ही अवघी १९ वर्षांची आहे. मिस इंडिया ही स्पर्धा जिंकल्यानंतर नंदिनी आता मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मणिपूरमध्ये फेमिना मिस इंडियाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. दरम्यान अवघ्या १९ व्या वर्षी मिस इंडिया बनून नंदिनी अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. ती रतन टाटा यांना सर्वांत प्रभावशाली व्यक्ती मानते. याशिवाय अभिनेत्री प्रियांका चोप्राकडून नंदिनीने प्रेरणा घेतली होती. दरम्यान या स्पर्धेचे परीक्षण नेहा धुपिया, बॉक्सर लैश्राम सरीता देवी, कोरिओग्राफर टेरेन्स, चित्रपट दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी आणि फॅशन डिझायनर्स रॉकी स्टार आणि नम्रता जोशीपुरा यांनी केले.
नंदिनी ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. इन्स्टग्रामवर तिचे ११.१ के फॉलोवर्स आहेत. नंदिनी ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. फेमिना मिस इंडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नंदिनीचे मिस इंडिया कार्यक्रमातील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.