
मी आणि राजश्री मुंडेनी मिळून संसार करायचे ठरले होते
करुणा मुंडे यांचा धक्कादायक खुलासा, गोपीनाथ मुंडेबाबत केले भाष्य, म्हणाल्या दोघींनी मिळून धनंजय मुंडे...
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. त्यावर करूणा मुंडे आपल्या पत्नी नसल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केल्याने चर्चा सुरू झाली आहे.
आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. तसेच पोटगीसाठी अर्ज केला आहे. पण करुणा शर्मासोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही. असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. पण आता करुणा मुंडे यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. राजश्री मुंडे आणि तुमच्यातील नातं कसं आहे? यावर करुणा शर्मा म्हणाल्या की, राजश्रीची आणि माझी अनेक वेळा भेट झालेली आहे. आमच्या दोघींचं नातं चांगलं होतं, आमच्यात कसलेही प्रॉब्लेम्स नव्हते. दोघींनी मिळून सगळा संसार चालवायचा आणि धनंजय मुंडेंना सांभाळायचं, असं ठरलं होते, असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच आमच्या नात्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना सगळं माहिती होतं. माझ्या लग्नाच्या वेळी खूप अडचणी आल्या. धनंजय मुंडेंनी माझ्या आईकडे माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली होती. परंतु माझे घरचे तयार नव्हते. तरीही आम्ही इंदौरमध्ये लग्न केल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. यामुळे या प्रकरणात ट्विट निर्माण झाला आहे.
धनंजय मुंडे आणि माझ्यातील दोघांमधला वाद मिटवून घेण्यासाठी आणि लिव्ह-इन-रिलेशनशीप मान्य करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मला ५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा करुणा शर्मांनी केला आहे. त्यामुळे कोर्टाच्या पुढच्या सुनावणीकडे लक्ष असणार आहे.