Latest Marathi News
Ganesh J GIF

पूजा खेडकर प्रकरणावर रवींद्र धंगेकर संतापले

राज्यात सध्या चर्चेत आलेली वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरने एम.बी.बी.एसचे शिक्षण पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून पुर्ण केलं होतं.तिथे प्रवेश घेताना तिने ती पुर्णतः फीट असल्याचं तिला कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट सादर केलं होतं. पूजा खेडकर प्रकरणात अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. अशातच या संपुर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

रवींद्र धंगेकर यांनी खेडकर कुटुंबियांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, त्यांची सखोल चौकशी करा, अशी मागणी केली आहे. राजकीय नेत्यांच्या मागे इडी लावण्यापेक्षा आता या अधिकाऱ्यांवर ईडी लावा. संपूर्ण खेडकर कुटुंब भष्ट्राचारी आहे. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढा घोळ घालणं अशक्य आहे असं देखील रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. पूजा खेडकरने परीक्षेवेळी चुकीची कागदपत्रे जमा केली. बोगस कागदपत्रे देऊन तिने प्रवेश घेतला. या संपुर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा. तिने मोठ्या भ्रष्टाचाराने हे पद मिळवले आहे, त्याचा तपास व्हावा असंही धंगेकरांनी म्हटलं आहे.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकरनं पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एसचे शिक्षण पुर्ण केलं होतं. तिथे प्रवेश घेताना तिने ती पुर्णतः फीट असल्याचं तिला कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्याचबरोबर त्यावेळी तिचे वडील दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असताना देखील तिने ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमीलियर सर्टिफिकेट देखील सादर केलं असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेताना तिचं नाव पूजा दिलीपराव खेडकर म्हणून नोंद करण्यात आलं होतं. आता समोर आलेल्या या माहितीच्या आधारे पूजावरती कोणती कारवाई होणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!