मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाने ठाकरेंपुढे माघार घेतली आहे. पक्ष कार्यालयाचा वाद टाळण्यासाठी शिंदे गटाने सातव्या मजल्यावर वेगळे कार्यालय स्थापन केले आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ठाकरे गटाची सरशी झाली आहे. ही सरशी चिन्हाच्या बाबतीतही राहील का? याचा फैसला अद्याप बाकी आहे.
आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. शिंदे सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये शिवसेना आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. पण, पक्ष कार्यालयाचा वाद टाळण्यासाठी शिंदे गटाने सातव्या मजल्यावर वेगळे कार्यालय स्थापन केले आहे. असे असले तरीही व्हीपचा वाद मात्र कायम आहे.”आम्ही जारी केलेला व्हिप सर्व शिवसेना आमदारांना लागू होईल. दप्तरी नोंद असल्याने प्रमाणे नियमानुसार माझी प्रतोद म्हणूनच नियुक्ती आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना देखील व्हिप लागू होईल, असा दावा सुनील प्रभू यांनी केला आहे. तर गोगावलेंनीही आपला व्हीप सर्वांना लागू होईल असे सांगितले आहे. पण पक्ष कार्यालय पटकावत ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा अध्यक्षांनी अधिकृत शिवसेना पक्ष प्रतोद म्हणून गोगावलेंना मान्यता दिल्याने प्रभू यांच्या व्हिपला अर्थ उरलेला नाही, असा दावा शिंदे गटाचा आहे. त्यामुळे खरा व्हिप कुणाच हे पाहण्याचं ठरणार आहे.