Just another WordPress site

हडपसर वाहतूक पोलिसांचं सर्वत्र कौतुक

वाहतूक पोलिसांनी बुजवले ब्रिज वरील खड्डे

हडपसर, पुणे (प्रतिनिधी – तुकाराम गोडसे)- पुणे सासवड रोड हा मोठा वर्दळीचा रस्ता.. खड्यामुळे रोजच अपघात होत आहेत. काही लोकांना खड्यामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. सासवड रोडवरील रेल्वे उड्डाणपूलावर देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. हडपसर वाहतूक पोलिसांनी एक माणुसकी प्रति एक चांगला काम केलं आहे.

हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पावर हाऊस चौक फुरसुंगी या ठिकाणी असलेल्या रेल्वे ब्रिजवर खड्डे पडल्याने दिवसभर वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. ही बाब हडपसर वाहतूक पोलीस निरीक्षक लकडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच सूत्रे फिरवली..पावर हाऊस चौक येथील कर्मचारी पोलीस हवालदार इरकर , पोलीस शिपाई राऊत, पोलीस शिपाई जाधव व पोलीस शिपाई लवटे यांना अपघात होऊ नये ही दक्षता घेण्यासाठी पोलीस निरीक्षक यांनी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. वाहतूक पोलिसांनी पावर हाऊस उड्डाणपूलावरील खड्डे स्वतःबुजवून घेतले व नागरिकांना वाहतुकीस होणारा अडथळा दूर केला.

GIF Advt

यामुळे उत्तम कामगिरीमुळे हडपसर वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!