Latest Marathi News
Ganesh J GIF

रीलस्टार पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

इन्स्टाग्रामवरील ओळखीचे प्रेमात रुपांतर, पतीचा अडथळा ठरताच काढला काटा, तपासात धक्कादायक खुलासा

भिवानी- हरियानामधील भिवानी येथे एका रिलस्टार पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर दोघांनी मिळून नवऱ्याच्या मृतदेहाची विल्हेवाट देखील लावली होती.

रवीना आणि तिचा पती प्रवीण यांचे २०१७ रोजी लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षांचा एक मुलगा आहे. रवीनाला रिल्स बनवून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा नाद होता. तिचे इन्स्टावर ३० हजाराहून अधिक फाॅलोअर्स होते. पण तिचा पती प्रवीनला हे आवडत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. दीड वर्षांपूर्वी रवीनाची ओळख हिस्सार जिल्ह्यातील युट्यूबर सुरेशशी झाली. इन्स्टाग्रामवरून झालेल्या मैत्रीनंतर दोघेही जवळ आले, त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. प्रवीण वाळू आणि दगड वाहून नेण्याच्या दुकानात चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे दोघेही प्रवीण घरी नसताना भेटू लागले. पण २५ मार्चला प्रवीणने रवीना आणि सुरेशला नको त्या अवस्थेत पकडले. त्यावेळी दोघात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर सुरेश आणि रवीनाने प्रवीणचा खून करण्याचे ठरवले. त्यातूनच प्रवीण आपलं पितळ उघड करेल या भीतीने रवीना आणि सुरेशने मिळून ओढणीने त्याची गळा दाबून हत्या केली. परंतु मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रात्र होईपर्यंत आणि सर्व झोपेपर्यंत वाट पाहिली. जेव्हा नातेवाईकांनी प्रवीण कुठे आहे विचारले तेव्हा माहिती नसल्याचं नाटक तिने केले. रात्री अडीच वाजता जेव्हा सर्व झोपले होते तेव्हा बाईकवरून रवीना आणि सुरेश यांनी मृतदेह ६ किमी दूर फेकून दिला. २८ मार्च रोजी प्रवीणचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला त्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या घरातून एक दुचाकी आणि त्यावर संशयित आरोपी दिसले. रवीनाने चेहऱ्यावर कपडा बांधला होता. बाईकवर दोघांच्यामध्ये प्रवीणचा मृतदेह होता. पोलिसांनी जेव्हा खाकीचा धाक दाखवला तेव्हा रवीना आणि तिच्या प्रियकराने गुन्हा कबूल केला. प्रवीणच्या हत्येनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशी सुरु केली आहे. या चौकशीदरम्यान दोघांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. प्रवीणची हत्या केल्यानंतर रवीनाला कोणताही पश्चाताप तिच्या चेहऱ्यावर झालेला दिसत नव्हता.

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या रवीनाला रीन तयार करण्याची आवड होती. तिच्या या आवडीवर प्रवीणच्या कुटुंबाचा आक्षेप होता. रवीणाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!