Latest Marathi News
Ganesh J GIF

नंबरप्लेट नसल्याने कार खरेदी करण्यास दिला नकार; पोलीस असल्याचा बनाव करत भंगार व्यावसायिकाचे अपहरण करून लुटले

नंबरप्लेट नसल्याने कार खरेदी करण्यास नकार देणार्‍या भंगार व्यावसायिकाचे अपहरण करुन पोलीस असल्याचा बनाव करुन पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणार्‍या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कार व दोन गावठी पिस्तुले, ८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

संतोष लक्ष्मण भंडलकर (वय ४२), सुरेश अशोक राखपसरे (वय ३३), शेखर सुभाष शिंदे (वय ३२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुरज शंकर मदने , हरीभाऊ बबन खुडे, अशोक गणपत बनसोडे यांचा शोध घेण्यात येत आहे.याप्रकरणी कुतुबुद्दीन सुभेदार शहा (वय ४०,) यांचे वंजारवाडी येथील लोखंडे वस्तीत भंगार खरेदी विक्रीचे दुकान आहे. २३ सप्टेंबर रोजी ते दुकानावर असताना चार जण आले. त्यांच्याकडील पांढरे रंगाची आय २० कार विक्री करायची असल्याचे सांगितले. कारला कोणताही नंबर नसल्याने त्यांनी कार खरेदी करण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करुन त्यास आय २० कारमध्ये बसवून घेतले. त्यांच्याजवळील मोबाईल व ८ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. तू चोरीचा माल खरेदी केला आहे. १५ लाख रुपये दे नाही तर तुला भिगवण पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ असे आरोपींनी सांगितलेत्यानंतर फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने पिस्तुल काढून त्याचा धाक दाखवून ओरडायचे नाही असे सांगितले.

त्यानंतर त्यांना दौंड -नगर हायवे रोडने घेऊन जाऊन चिखली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ सोडून दिले. या घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करण्यात आली. फिर्यादीला ज्या रोडने नेण्यात आले. त्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलो असताना पांढरे रंगाची आय २० कार आढळून आली. ही कार संतोष भंडलकर हा वापरत असून त्याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची बातमी मिळाली.संतोष भंडलकर हा त्याच्या कारने साथीदारांसह सोलापूरकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोलापूर हायवे लगत हिंगणगाव परिसरात सापळा रचून संतोष भंडलकर सह दोघांना पकडले. त्यांच्या चौकशीत इतरांची नावे निष्पन्न झाली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!